वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सदस्य आणि कुटुंबे आम्हाला सर्वाधिक विचारतात त्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे.
नोंदणी मोफत आहे का?
हो. खाते आणि प्रोफाइल तयार करणे मोफत आहे. एखाद्याशी संपर्क साधायला तयार झाल्यावरच योजना घ्यायची.
फोटो कोण पाहू शकते?
तुमचे फोटो सर्व सदस्यांना दिसतात. सेटिंग्जमध्ये फोटो लपवल्यास, ज्यांचे स्वारस्य तुम्ही स्वीकारले आहे किंवा ज्यांची फोटो विनंती तुम्ही मंजूर केली आहे, त्यांनाच ते दिसतात. बदल लगेच लागू होतो.
नंबर पडताळणी कशासाठी?
पडताळलेल्या प्रोफाइलवर खूण दिसते, आणि अशा प्रोफाइलकडे स्वारस्य जास्त येते. नंबर प्रोफाइलवर दिसत नाही.
माझी माहिती सुरक्षित आहे का?
तुमचा संपर्क क्रमांक तुम्ही ठरवलेल्या सदस्यांनाच दिसतो. पसंतीची यादी कोणालाही दिसत नाही.
स्वारस्य पाठवल्यावर पुढे काय?
समोरच्या सदस्याला सूचना जाते. त्यांनी स्वीकारले की दोघांना एकमेकांचे संपर्क क्रमांक दिसतात.
शुल्क परत मिळते का?
सदस्यता सुरू झाल्यापासून सात दिवसांत विनंती केल्यास पूर्ण रक्कम परत मिळते.
प्रोफाइल काही काळ लपवू शकतो का?
हो. सेटिंग्जमधून प्रोफाइल लपवा — शोधात दिसणे थांबते, माहिती तशीच राहते.
खाते कायमचे काढता येते का?
हो, सेटिंग्जमधून. एकदा काढल्यावर माहिती परत मिळत नाही, म्हणून आधी तात्पुरते बंद करण्याचा विचार करा.
आई-वडील किंवा भावंडे माझी प्रोफाइल सांभाळू शकतात का?
हो. प्रोफाइल सांभाळायला मदत करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीला आमंत्रित करा, आणि त्यांनी त्यावर काय करावे ते तुम्ही ठरवा.
माझी विवाह संस्था आहे. ती विवाहस्वप्नसोबत काम करू शकते का?
हो. विवाह संस्था भागीदारी योजनेत मोफत सामील होतात आणि त्यांच्या ग्राहकांनी घेतलेल्या योजनांवर कमिशन मिळवतात. विवाह संस्थांसाठीच्या पानावर संपूर्ण माहिती आहे.
तुमच्याशी संपर्क कसा साधायचा?
सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत +91 99206 43919 वर फोन करा किंवा support@vivahswapn.com वर ईमेल करा. लॉग इन केलेले सदस्य 'मदत' मधून तक्रारही नोंदवू शकतात.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही? संपर्क

