तुमचे विवाहस्वप्न खाते हटवा
Vivahswapn · विवाहस्वप्न · प्रकाशक: BitMask LLP
विवाहस्वप्न हे मराठी विवाह जुळवणारे ॲप आणि वेबसाइट आहे. तुमचे खाते आणि त्यासोबतची माहिती तुम्ही खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने हटवू शकता.
विवाहस्वप्न ॲपमधून
- ॲप उघडा आणि साइन इन करा.
- “माझे” टॅब उघडा, मग “सेटिंग्ज” निवडा.
- “खाते कायमचे काढा” वर टॅप करा.
- खाते कोणत्या तारखेला हटवले जाईल हे समजल्याची खूण करा, मग “माझे खाते हटवा” वर टॅप करा.
वेबसाइटवरून
- या वेबसाइटवर साइन इन करा.
- “सेटिंग्ज” उघडा.
- “खाते कायमचे काढा” वर क्लिक करा, खाते कोणत्या तारखेला हटवले जाईल हे समजल्याची खूण करा, मग “माझे खाते हटवा” वर क्लिक करा.
साइन इन करता येत नसेल तर
तुमच्या खात्यावर नोंदवलेल्या ईमेल पत्त्यावरून support@vivahswapn.com वर लिहा, किंवा +91 99206 43919 वर फोन करून खात्यावर नोंदवलेला मोबाईल नंबर आम्हाला कळवा, आणि खाते हटवायला सांगा. विनंती तुमचीच आहे याची खात्री केल्यावरच आम्ही ती पूर्ण करतो.
पुढे काय होते
- तुमची प्रोफाइल्स लगेच शोध आणि जुळण्यांमधून बाहेर जातात, आणि प्रत्येक डिव्हाइसवरून तुम्ही साइन आउट होता.
- मन बदलण्यासाठी तुमच्याकडे ३० दिवस असतात. या काळात साइन इन केल्यास खाते हटवणे रद्द होते, आणि काहीही गमावले जात नाही.
- ३० दिवसांनंतर तुमचे खाते कायमचे पुसले जाते: तुमची प्रोफाइल्स, फोटो, पडताळणीची कागदपत्रे, पत्रिका, संदेश आणि त्यांसोबतच्या फाईल्स, कॉल रेकॉर्डिंग, स्वारस्ये, पसंती, कुटुंबीयांना दिलेला प्रवेश, मदतीच्या विनंत्या आणि सूचनांसाठी नोंदवलेली डिव्हाइसेस.
आम्ही काय ठेवतो
पेमेंट, पावत्या आणि कराच्या नोंदी कायद्याने आवश्यक असेल तेवढा काळ ठेवल्या जातात. तुम्ही रेफरलची कमाई घेतली असल्यास, तिच्याशी संबंधित कराचा तपशील आणि KYC कागदपत्रेही ठेवली जातात. दुसऱ्या सदस्याबद्दलच्या तक्रारीशी जोडलेला मजकूर ती तक्रार निकाली निघेपर्यंत ठेवला जाऊ शकतो.
खाते न हटवतासुद्धा, संदेश पाठवल्यानंतर ६० दिवसांनी आणि कॉल रेकॉर्डिंग कॉलनंतर ३० दिवसांनी आपोआप हटवले जातात.
खाते न हटवता काही माहिती हटवा
खाते न हटवता, खालील गोष्टी तुम्ही स्वतः कधीही काढू शकता:
- फोटो: ॲपमध्ये “माझे” → “फोटो”; वेबसाइटवर “माझी माहिती”. फोटोवरील “काढा” वर टॅप करा.
- प्रोफाइलमधील माहिती: ॲपमध्ये “माझे” → “माझी माहिती”; वेबसाइटवर “माझी माहिती”. एखादा विभाग संपादित करून त्यातील माहिती बदला किंवा काढा. बदल दिसण्यापूर्वी आमची टीम तो तपासते.
- एखादे प्रोफाइल: “सेटिंग्ज” मधील “हे प्रोफाइल हटवा” तुम्ही वापरत असलेले प्रोफाइल हटवते. तुमचे खाते आणि इतर प्रोफाइल्स तशीच राहतात, आणि ते प्रोफाइल ३० दिवसांनंतर कायमचे पुसले जाते.
- कुटुंबीयांचा तुमच्या प्रोफाइलवरील प्रवेश: ॲपमध्ये “माझे” → “कुटुंबीय”; वेबसाइटवर “कुटुंब”. त्यांना निवडा, मग “प्रवेश काढा”.
- संदेश आणि कॉल रेकॉर्डिंग एकेक करून हटवता येत नाहीत. ते आपोआप हटवले जातात: संदेश ६० दिवसांनी आणि रेकॉर्डिंग ३० दिवसांनी.
- इतर काहीही हटवायचे असल्यास, उदा. रेफरल कमाईसाठी दिलेला तपशील, support@vivahswapn.com वर ईमेल करा किंवा +91 99206 43919 वर फोन करा आणि काय हटवायचे ते सांगा. विनंती तुमचीच आहे याची आधी खात्री करून आम्ही ती पूर्ण करतो.
फक्त काही काळ थांबायचे आहे?
सेटिंग्जमधील “खाते तात्पुरते बंद करा” काहीही न हटवता तुमची प्रोफाइल्स शोध आणि जुळण्यांमधून लपवते. तुमची योजना सुरू राहते, आणि “खाते पुन्हा सक्रिय करा” निवडल्यावर प्रोफाइल्स पुन्हा दिसू लागतात.

